सावत्र आई – भाग २

जानकीच्या या ओरडण्यात भीती आणि काळजी होती. पण सुधीरला मात्र काकूंचे शब्द आठवले—’सावत्र आई तुझा छळ करेल.’ त्याला वाटले की ती त्याच्यावर उगीचच ओरडत आहे. एवढ्यात बाहेरून दोन्ही काकू आल्या. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि आगीत तेल ओतण्याची संधी साधली.   मोठी काकू म्हणाली, “बघा गं बायकांनो, पोरगं भुकेने व्याकुळ झालं म्हणून स्वतः करायला गेलं. … Read more

सावत्र आई – भाग १

गावाकडच्या त्या जुन्या, कौलारू घराच्या पडवीत बसून सुधीर सुन्नपणे बाहेर पसरलेल्या अंधाराकडे पाहत होता. आज १५ दिवस झाले होते. त्याच्या वडिलांचे, म्हणजे अण्णांचे निधन होऊन १५ दिवस पूर्ण झाले होते. श्राद्धाचे सगळे विधी आजच पार पडले होते. पाहुणेरावळे, नातेवाईक एक-एक करून आपापल्या घरी निघून गेले होते. घरात आता एक शांतता पसरली होती, पण ती शांतता … Read more

कर्तव्य की उपकार ( हृदयस्पर्शी मराठी कथा) – भाग ३ अंतिम भाग

“विनय… अरे, त्यात सुमितचे काय चुकले? तो बरोबर तर म्हणतोय!” नरेश अतिशय थंडपणे म्हणाला,   ” काय? दादा… तू हे काय बोलतोयस?”   “अरे विनय, समजून घे ना. सुमित नवीन संसार करतोय. त्याची बायको शिकलेली, हायफाय आहे. त्यात अर्णव तिथे जाऊन राहिला, तर त्यांना उगाच अडचण होणार ना? त्यांच्या रोजच्या राहणीमानात फरक पडेल. त्यापेक्षा तू … Read more

कर्तव्य की उपकार (हृदयस्पर्शी कौटूंबिक कथा) – भाग २

विनयच्या कष्टाचे फळ मिळाले. सुमितने इंजिनिअरिंग उत्तम गुणांनी पूर्ण केले आणि त्याला पुण्यातील एका मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) उत्तम पगाराची नोकरी मिळाली. सुमितचे यश पाहून विनयच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. त्याने संपूर्ण गावात मिठाई वाटली. “माझा सुमित आता साहेब झाला!” विनय अभिमानाने सर्वांना सांगत सुटला होता.   काही वर्षांतच सुमितच्या लग्नाचा विषय निघाला. गावातील … Read more

नवी पहाट ( एक भावनिक कथा) – भाग २ अंतिम भाग

सुनंदाताईंनी हातातील भाजी बाजूला ठेवली. त्या शांतपणे म्हणाल्या,   “सुधा, जरा हळू बोल. ती ऐकेल.”   “ऐकू दे ना! माझी इच्छा आहे की तिने सुद्धा ऐकावे.” सुधाताई तावातावाने म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या.   “वहिनी, अहो ती तुमची सुन आहे. तिचा नवरा गेलाय. तिने जरा तरी दुःखाचे, संयमाचे भान ठेवायला नको का? पूर्वीच्या काळी विधवा स्त्रिया … Read more

हक्काची सावली – भाग १० ( अंतिम भाग )

  ” तू…आता तू काय करत आहेस इथे ?” वनमालाबाई तिला म्हणाल्या.   ” काय करत आहेस म्हणजे काय ? हे माझं सुद्धा घर आहे. आणि ही इथे काय करत आहे ?” मनाली ने प्रतीक्षा ला पाहून उलट प्रश्न केला.   ” तिला मी घेऊन आली आहे इथे. आणि तू कोणत्या तोंडाने या घराला आपलं … Read more

हक्काची सावली – भाग ९ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

  तिथे बराच वेळ तमाशा घालून, लग्नाचा दबाव टाकून काहीच होत नाही हे बघून रघु आणि त्याची आई शेवटी परत गेले. पूजाची आई सुद्धा परत गेली. पण पूजा मात्र आता हट्टालाच पेटली होती की तिला प्रतीक्षासोबत रहायचे नाहीच म्हणून. रोहन ने तिला खूप समजावले पण ती काही ऐकायलाच फायर होत नव्हती.   शेवटी गणपतराव रोहनला … Read more

हक्काची सावली – भाग ८ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

  देशमुखांचा मोठा बंगला आता ओसाड वाटू लागला होता. एकेकाळी गाड्यांचा आवाज, पाहुण्यांची वर्दळ, हशा आणि अभिमानाने भरलेलं ते घर आता शांततेने भरून गेलं होतं. त्या शांततेत फक्त तीन आवाज राहिले होते.व्हीलचेअरची चरचर. वनमालाबाईंचा दमलेला श्वास. आणि घरकामाला असलेल्या बायकांचा आवाज.   अपघातानंतर अभिजीत पूर्ण बदलला होता. पूर्वी आरशासमोर तासन्तास स्वतःकडे पाहणारा तो आता आरशापासून … Read more

हक्काची सावली – भाग ७ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  त्या दिवसानंतर प्रतीक्षाच्या आयुष्यात एक विचित्र शांतता आली होती. पण ती शांतता सुखाची नव्हती. ती होती वादळानंतर उरलेल्या उजाडपणाची. तिला आता वास्तवाची जाणीव व्हायला लागली होती.   प्रत्येक सकाळी जाग आली की काही क्षण तिला वाटायचं की“हे सगळं स्वप्न होतं.” पण लगेच वास्तव समोर उभं राहायचं. तिचं तुटलेलं लग्न. हरलेला संसार. आणि आतून रिकामी … Read more

हक्काची सावली – भाग ६ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. दुपारच्या उन्हाने जमिनीला चटके बसत होते. गावातल्या रस्त्यांवर धुळीचे लोट उडत होते. हवा गरम आणि कोरडी झाली होती. पण त्या उष्णतेपेक्षाही जास्त जळत होतं प्रतीक्षाचं मन. तिच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आता थकवणारी झाली होती.   कोर्ट. तारखा. लोकांचे प्रश्न. वहिनीचे टोमणे. पैशांची चिंता. आणि सगळ्यात जास्त—अभिजीतचं बदललेलं रूप. ती … Read more