तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग १ (प्रेरणादायी मराठी कथा)

वसुधा म्हणजे तिच्या सासरच्या घराचा आधारस्तंभच होती. कुठलाही कार्यक्रम असो, लग्न असो, बारसं असो, वाढदिवस असो किंवा कुणी आजारी असो. सर्वांच्या तोंडी एकच नाव असायचं. ते म्हणजे वसुधा. वसुधा देखील कधी नाही म्हणायची नाही. स्वतःच्या संसाराकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांचं काम राहायला नको, असा तिचा स्वभाव होता.   “अगं, सगळ्यांची जबाबदारी तूच … Read more

निर्णय – भाग १९

  नकुल नंदिनीला घ्यायला तिच्या कॉलेजसमोर आला. त्याने नंदिनीला कॉल करून आपण आल्याचे कळवले. नंदिनी तशीच धावत गेट जवळ गेली. तिने त्याला पाहिले. कधी नव्हे ते आज त्याला पाहून तिच्या काळजात काहीतरी झाले. काय ते तिला कळत नव्हते पण आज त्याला पाहून जे वाटले ते आधी वाटले नव्हते. फॉर्मल कपड्यात तो अगदीच रुबाबदार दिसत होता. … Read more

निर्णय – भाग १३

    समोर रवीची आई उभी होती. त्यांना पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. ते शालू ताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.   मग शालूताई त्यांना म्हणाल्या.   ” अरे असा काय बघत आहेस??? मला इकडेच काम होतं आणि म्हटलं मी इकडे येत आहे तर तुलाही सोबत घेऊन यावं… शेवटी तुलाही कळायला हवं ना की तुझ्या बहिणीने तुझ्या … Read more

निर्णय – भाग १०

  सरलाताईंनी गरम गरम स्वयंपाक करून नंदिनीला वाढून दिले. सुरुवातीला संकोचणारी नंदिनी नंतर व्यवस्थित जेवली. उषाताईंनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन सरला ताईंना फोन लावला आणि नंदिनी ची चौकशी केली. सरला ताईंनी नंदिनी कडे फोन नेऊन दिला. उषाताईंनी तिला विचारले.     कशी आहेस बाळा…?     ठीक आहे आई…     आणि असे म्हणताच तिचा … Read more

बापमाणूस

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच तो इकडून तिकडे चकरा मारत होता. इतक्यात नर्स बाहेर आली आणि त्याला आनंदाची बातमी देत म्हणाली.   ” अभिनंदन…तुम्हाला मुलगी झाली आहे…”   हे ऐकून हरी आनंदाने वेडा झाला होता. “पारू, बघ ना…आपल्या घरी लक्ष्मी … Read more

हरवलेलं प्रेम – भाग ५

      लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.   हा तोच क्षण होता लग्नाचा…ज्या क्षणापासून ही कथा सुरू झाली होती. लग्नमंडप दिव्यांनी उजळून निघाला होता. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं होतं. पाहुण्यांची ये-जा सुरू होती. कुठे गप्पा, कुठे हशा, तर कुठे फोटो … Read more

हरवलेलं प्रेम – भाग ४

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   “तू… काय म्हणालास?”   मिलिंद शांतपणे म्हणाला,   “मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल… तर आपण लग्न करू शकतो.”   मेघनाच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं.   “बाळा… तू आम्हाला कोणत्या संकटात वाचवत आहेस ह्याची तुला कल्पना नाही..” त्या म्हणाल्या. मेघना अजूनही विचारात होती.   “पण… तुझं लग्न झालं होतं … Read more

उंबरठ्यापलीकडचे सुख

  सुधाला एका मोठ्या घरातले स्थळ आले तेव्हा तिच्या माहेरी सगळेच आनंदाने हरखले होते. दिनकरच्या घरचे लोक म्हणजे मोठं प्रस्थ होतं. गावी त्यांचे मोठे वाड्यासारखे घर होते. दिनकरला आणखी 3 भाऊ होते. दिनकर पेक्षा मोठा एक भाऊ आणि दोन भाऊ अजून लहान होते.     सुधा कासखेडी सारख्या एका छोट्याशा गावात राहणारी एक साधी, कष्टाळू … Read more

आई होण्याची किंमत

  केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून हात फिरवत तिने खोल श्वास घेतला. आत बाळाची हलकीशी हालचाल जाणवली आणि क्षणभर तिच्या ओठांवर हसू उमटलं. “तू आहेस ना… एवढंच पुरेसं आहे,” ती स्वतःशीच पुटपुटली.   केतकी आणि केदारचं लग्न होऊन आता एक वर्ष … Read more