चुकलेली पारख

  ” आई…मला प्रीती खूप आवडते गं…माझं खूप प्रेम आहे तिच्यावर…आणि मी तिला आजच नाही ओळखत… मागच्या सात वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो…ती खरंच खूप चांगली मुलगी आहे…” ऋषी आईला समजावत म्हणाला. ” अरे तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी…मी चांगलीच ओळखते अशा मुलींना…आपलं घर पाहून भाळली असेल तुझ्यावर…नाहीतर तिचं घर बघितलंस का…? किती लहान आहे…अन् तिच्या … Read more

अधिकार – भाग २(अंतिम भाग)

तसेच समर्थ ने सुद्धा आजी म्हणून त्यांना मान द्यायला हवा, त्यांच्या मागेपुढे करायला हवं असं त्यांना वाटायचं. समर्थ नुसता आई आई करतो हे त्यांना आधी जरा खटकायचं. पण जेव्हापासून त्या त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन आल्या तेव्हापासून त्यांना वाटत होतं की त्यांच्या बहिणीची नातवंडं जशी आईपेक्षा आजीच्या जवळ जास्त राहतात तसं समर्थने सुद्धा राहावं. शाळेतून आला … Read more

मराठी कथा – जाणिव

मंदाताईंनी आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करुन होते. सुवर्णा दिसायला चांगली आणि शिकलेली मुलगी होती. तिचा नवरा संकेत मुंबईत एका चांगल्या नोकरीत कार्यरत होता. त्याचा मुंबईत स्वतःचा टूबीएचके चा फ्लॅट होता. सुवर्णाचे सासू सासरे गावी राहायचे. त्यांचा चांगला राजा राणीचा संसार सुरू होता सुवर्णा आणि संकेतचा. आपल्या मुलीला आनंदात पाहून मंदाताई खूप खुश होत्या. … Read more

अस्सल सोनं

दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या दिपाला तिच्या सासूबाई सकाळपासून नुसत्या न्याहाळत होत्या. दीपा मात्र सकाळपासून कामात मग्न असल्याने तिचे याकडे फारसे लक्ष नव्हते. शेवटी न राहवून सासूबाईंनी विचारलेच. ” काय ग दीपा… तु घातलेले कानातले सोन्याचे आहेत का?… “ ” हो आई…मागच्याच महिन्यात केले होते…” दीपा ने उत्साहाने सांगितले. ” अमोल ने करून दिलेत का…? “सासूबाईंनी … Read more

मराठी कथा/ वारस – भाग ४( अंतिम भाग)

थोड्याच वेळात रिक्षा राधाच्या, म्हणजेच अर्णवच्या आजोळच्या घरी पोहचली सुद्धा. राधासोबत अर्णवला आलेलं पाहून राधाच्या सासुबाई एकदमच हरखल्या. त्यांनी त्याला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली. त्याचे मामा आणि आजोबा सुद्धा त्याला पाहून आनंदून गेले. त्याचे किती लाड करू अन् किती नाही असे झाले होते सर्वांना. लहानग्या अर्णवला हे सर्व काय होतंय ते … Read more

मराठी कथा / वारस – भाग ३

तशी निमाताईंना तिला मदत करायला काहीच हरकत नव्हती. पण तिच्या सांगण्याची पद्धत मात्र त्यांना रूचायची नाही. सुरुवातीला अर्णव रडल्यावर लगेच त्याच्या जवळ जाणारी कल्पना आता तो रडून रडून दमून जायचा तरीही त्याला लवकर जवळ घ्यायची नाही. निमाताईंना हा बदल लक्षात आला होता पण दोघांचा नवीन नवीन संसार आहे हा विचार करून त्यांनी दोघांनाही तसे बोलून … Read more

नात्यांचे वर्तुळ – भाग ३ (अंतिम भाग)

मग मिनाची आई म्हणजेच सारिकाची सासू सारिका ला म्हणाली. ” सारिका…तुला काय माझी मुलगी भार झालीय का…विसरू नकोस की हे घर तुझ्या आधी तिचं आहे… जेवढा हक्क या घरावर तुझ्या नवऱ्याचा आहे तेवढाच हक्क माझ्या मुलीचा पण आहे…म्हणून तुला तिला बोलण्याचा काहीही हक्क नाही…तिला हवे तेवढे दिवस ती तिच्या हक्काच्या घरात राहील…अगदी कायमची राहिली तरी … Read more

नात्यांचे वर्तुळ – भाग २

आरवला दिवसभर घरी सोडून जाताना अर्पिताचा जीव खाली वर व्हायचा पण घरी सर्वांसोबत आरव छान रुळला होता. त्यामुळे त्याची काही फारशी काळजी करण्याची गरज नव्हती म्हणून अर्पिता आता आरवला आई वडिलांकडे सोडून नोकरीवर जायला लागली होती. तरीपण सुधीर चे प्रीशा आणि आरव साठी सारख्याच वस्तू आणणे मीनाला खूप खटकायचे. अशातच आरवचा वाढदिवस आला आणि सुधीरने … Read more