हक्काची सावली – भाग ८ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

  देशमुखांचा मोठा बंगला आता ओसाड वाटू लागला होता. एकेकाळी गाड्यांचा आवाज, पाहुण्यांची वर्दळ, हशा आणि अभिमानाने भरलेलं ते घर आता शांततेने भरून गेलं होतं. त्या शांततेत फक्त तीन आवाज राहिले होते.व्हीलचेअरची चरचर. वनमालाबाईंचा दमलेला श्वास. आणि घरकामाला असलेल्या बायकांचा आवाज.   अपघातानंतर अभिजीत पूर्ण बदलला होता. पूर्वी आरशासमोर तासन्तास स्वतःकडे पाहणारा तो आता आरशापासून … Read more

हक्काची सावली – भाग ३ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

    “हे खोटं आहे…अभिजीतअसे वागू शकत नाहीत…” ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली.   “नाही… नाही…असं होऊ शकत…” ती वेड्यासारखी डोकं हलवत म्हणत होती.   शालिनीताईंनी सुद्धा डोळ्यांना पदर लावला. गणपतराव तर डोक्यावर हात देऊन सुन्न बसले. नेमके काय बोलावे हे कळत नसल्याने सुजित पुढे म्हणाला.   ” आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की काकू असे काहीतरी … Read more

हक्काची सावली – भाग २ (हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  माहेराच्या अंगणातल्या जुन्या चिंचेच्या झाडाखाली प्रतीक्षा शांत बसली होती. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वाऱ्याने झाडांची पानं सळसळत होती. दूर कुठेतरी मंदिराची घंटा वाजत होती.   पण तिच्या मनात मात्र फक्त एकच आवाज घुमत होता— “अभिजीत असे कसे बदलू शकतात…त्यांना माझ्या मनाची घालमेल माहिती नाही का…?” मग ती स्वतःलाच समजायची … Read more

माझी बायको नोकर नाही.

गिरिजा काकूंच्या दोन्ही मुलांची मल्हार आणि केदार ची लग्न एकाच दिवशी ठरवली होती. घरी पाहुण्यांचे आगमन झालेले होते. गिरिजा काकू स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होत्या. दोन्ही सुनांना द्यायचे कपडे, दागिने त्यांनी स्वतः पसंत केले होते. पण त्यांनी मुद्दामहून त्यांच्या मोठ्या सुनेसाठी हलक्या प्रतीच्या गोष्टी घेतल्या होत्या. त्यामानाने लहान सूनेसाठी सगळ्या महाग गोष्टी … Read more

काय भुललीस वरलीया रंगा – भाग ३ (अंतिम भाग)

” तू माझ्या प्रेमावर संशय घेतोस…अरे तुझ्यासाठी मी माझ्या दोन लहान मुलांना टाकून आलेय…” कावेरी म्हणाली. ” तेच तर…तू तुझ्या दोन लहान मुलांचा सुद्धा विचार केला नाहीस… मग मी असा कोण लागून गेलोय ग तुझा…बंद कर तुझी नाटकं…मी तुला कायमचा सोडून चाललोय…तुला आता काय करायचं ते तू ठरव…” अजय म्हणाला. आणि अजय खरोखर निघून गेला. … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ९ ( अंतिम भाग )

पल्लवी चे बोलणे ऐकुन नणंद ने शरमेने मान खाली घातली. पल्लवी काहीच चुकीचं बोलली नव्हती. तिच्या नणंद जवळ बोलायला एक शब्द सुद्धा नव्हता. तिची सासू मात्र पंकजच्या मुलाच्या उल्लेखाने क्षणभर विचारात हरवली. आणि पल्लवीला म्हणाली. ” तू बघितलंस माझ्या पंकजच्या मुलाला…?” ” हो…एकदा नाही तर खूपदा…” पल्लवी म्हणाली. ” कसा दिसतो तो…” सासूबाईंनी विचारले. ” … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ८

प्रीती बेडरूम मधून बाहेर येऊन बघते तर पंकज किचनमध्ये नाश्ता बनवत होता. त्याला नाश्ता बनवताना पाहून प्रीतीला खूप नवल वाटले. कारण यापूर्वी तिने त्याला कधीच किचन मध्ये काम करताना पाहिलं नव्हतं. ती त्याला म्हणाली… ” तुम्ही कशाला बनवलात नाश्ता…मी करणारच होते… काल प्रवासामुळे थकले होते ना म्हणून उठायला थोडा उशीर झाला…” प्रीती थोडी असहजतेने म्हणाली. … Read more

एकाच ह्या जन्मी जणू भाग – ७

  ” हो…कारण मी तुझ्यापेक्षा चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले आहेत…तुला मागच्या काही दिवसात खूप दुःखांचा सामना करावा लागला हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार…पण आयुष्यात आपल्याला जराही सुख मिळत असेल तर ते ओंजळीत भरून घ्यावं…भूतकाळ कुरवाळत बसल्यापेक्षा तुझा भविष्यकाळ कसा सुखी होईल याकडे लक्ष द्यायला हवं…” आई म्हणाली. ” जे काही मी भोगलय त्यासाठी … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ६

” तुम्ही…तुम्ही इथे कशाला आलात…?” प्रीतीने विचारले. ” तुला आणि आपल्या मुलाला सोबत घेऊन जायला…” पंकज म्हणाला. ” तुम्हाला काय वाटतं…तुम्ही काहीही बोलाल आणि की तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या बरोबर येईल…?” प्रीतीने विचारले. ” मला माहिती आहे…मी तुझ्याशी ज्याप्रकारे वागलो ते पाहता ती माझ्याशी असेच वागणे अपेक्षित आहे…पण मला खरंच माझ्या चुकांची जाणीव झाली आहे…तू … Read more

एकाच ह्या जन्मी जणू – भाग ५

” हो आई…मला कळत आहे मी काय बोलत आहे ते…आता मी त्यांच्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही…” पंकज म्हणाला. ” तिच्या भावांनी तुझ्या आईचा अपमान केला होता हे विसरलास का…?”  आई म्हणाली. ” आई…चूक तिची नाही तर तिच्या भावांची होती…प्रीती तर तुला काहीच बोलली नव्हती ना…आणि तू वाईट नको वाटून घेऊ पण त्या दिवशी … Read more